भारतरत्न अटलजी

भारतरत्न अटलजी

  • Rs450.00

भारतरत्न अटलजी 

'हम इस देश को जमीन का टुकडा नहीं समझते, ये जीता जागता राष्ट्रपुरुष है |' असे मानणारे ओतप्रोत देशभक्तीने भारलेले अटलजी.. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्थान मिळविलेले अटलजी.. आपल्या अमोघ वाणीने लाखो तरुणांवर राज्य केलेले अटलजी...उत्तम संसदपटू, तसेच विरोधी पक्षनेते राहिलेले अटलजी.. आपल्या अथक प्रयत्नाने भारतीय जनता पक्षाला सत्तास्थानापर्यंत पोहोचविणारे अटलजी.. पंतप्रधान पदाची शपथ घेताना लाखो भारतीयांचे जणु स्वप्न पूर्ण झाले म्हणून आनंदाश्रुंचे हकदार असलेले अटलजी.. उत्तम प्रशासक, कुशल संघटक, मृदुभाषी, विरोधकांच्याही हृदयात आदराचे स्थान मिळविणारे अटलजी..देश कि धडकन असलेले अटलजी.. अशी अटलजींची विविध रूपे भारतीयांनी गेली ६०-७० वर्षे पाहिली आणि त्यांच्यावर मनापासून प्रेम केले. त्यामुळे अटलजींची लोकप्रियता कधीच ओसरली नाही, ओसरणार नाही. अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या 'अटलजीं'ची ही चरित्र कहाणी डॉ. शरद कुंटे यांनी आपल्या ओघवत्या व रसाळ शैलीत सांगितलेली आहे, ती सर्वांना आवडावी. 'स्नेहल'ची ही अनुपम भेट अटलजींना समर्पित !

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Captcha

Tags: Bharatratna Atalji