कृष्णदेवराय

कृष्णदेवराय

  • Rs270.00

कृष्णदेवराय

इसवी सन ७१२ मध्ये महम्मद बिन कासीम याने भारतावर सिंध कडून स्वारी केली आणि त्य लढाईत राजा दाहीर याचा पराभव झाला. इथून पुढे सुमारे ८०० वर्षे भारतावर मुसलमान आणि मोगल यांचे साम्राज्य राहिले. या त्यांचं साम्राज्याला प्रखरपणे जर कुणी आव्हान दिले असेल तर ते विजयनगरच्या साम्राज्याने. हरिहर आणि बुक्कराय या दोघांनी या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि परमप्रतापी, लोकहितदक्ष राजा कृष्णदेवरायाच्या काळात विजयनगरचे हे साम्राज्य अजिंक्य, अजेय ठरले. याच काळात संस्कृती, धर्म, नृत्य, नाटक, साहित्य, संगीत या सर्व कलांचा उन्नत आविष्कार विजयनगरच्या साम्राज्यात झाला होता. कृष्णदेवरायाने प्रजेच्या कल्याणासाठी अनेक लोकोपयोगी कामे केलीत. त्याचे साम्राज्य विजयनगरपासून ते बेळगाव, गोवा, कटक ते श्रीलंकेपर्यंत विस्तारले होते..

शस्त्र आणि शास्त्र यावर चांगली पकड असणारा हा गुणग्राहक राजा होता. अशा या राजाचे व्यक्तिमत्व आपल्या रसाळ लेखणीने मराठी वाचकांसमोर आणण्याचे महत्वाचे काम डॉ लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी केले आहे. कादंबरीच्या स्वरुपात लिहिले असल्याने स्वाभाविकच पुस्तकाचे वाचन ज्ञानवर्धन करणारे तर आहेच पण त्याबरोबर मनोरंजन करणारे देखील आहे. मेहता पब्लिशिंग हाउस णे हे पुस्तक प्रकाशित केले आहे. 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Captcha

Tags: FB-3