मनाचे व्यवस्थापन

मनाचे व्यवस्थापन

  • Rs250.00

मनाचे व्यवस्थापन 

आपले मन हे अतिशय चंचल आहे. अनेक थोर पुरुषांनी मनाचे वर्णन वाऱ्यापेक्षाही वेगाने धावणारे असे केले आहे आणि हवेला नियंत्रित करणे जसे कठीण आहे तसेच काहीसे मनाचे आहे असे म्हटले आहे ते खोटे नाही. मानसिक अस्थिरता हा आपल्या सर्वांच्या अनुभवाचा विषय आहे. निरोगी शरीर आणि स्वस्थ मन असणारे लोक अभावानेच आढळतात. हीच मनाची अस्थिरता वाढली कि मग त्याचे व्यवस्थापन करणे, त्याला नियंत्रणात आणणे कठीण होते. बहुतेक वेळेला शरीराचे आरोग्य देखील मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. कोणत्याही गोष्टीचा किंवा भावनेचा अतिरेक हा घातक असतोच. प्रेम, आनंद, विनोद या सुखद अनुभूती देणाऱ्या भावना आणि राग, द्वेष, इर्षा, दुःख, भीती या नकारात्मक भावना मानवी मनातच असतात. या भावनांचे बंध मानवी मनाला हवे तसे ओढण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. पण या भावनांच्या बंधनात मनाला न अडकवता त्यांचे व्यवस्थापन कसे करावे हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर नेहमीच उभा असतो.

डॉ चंद्रशेखर पांडे यांनी या प्रश्नाचे सुंदर, सोप्या भाषेत सहज उत्तर दिले आहे. डॉ पांडे हे समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ आहेत. सुमारे ५० वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रात कार्य करीत आहेत. त्यांना आलेले अनुभव हे विलक्षण आहेत. त्यांच्या अनेक पेशंट कडून त्यांन काही नवीन शिकायला मिळाले आहे. असा हा अनुभवांचा खजिना त्यांनी आपल्यासमोर या पुस्तकाच्या माध्यमातून मोकळा केला आहे. सुबक रेखाचित्रांनी वाचन अधिक रंजक झाले आहे. साकेत प्रकाशन तर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.   


Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Captcha

Tags: FB-2