Picture of दिग्विजयी रघुवंश

दिग्विजयी रघुवंश

Manufacturer: Sevika Prakashan
रघुवंशाचा प्रदीर्घ चंडप्रतापी इतिहास हा भारतवर्षाच्या प्राचीन जीवनधारेची थोर गुणवत्ता प्रकट करणारा गौरवान्वित इतिहास आहे. विशेषत: दंडसत्ता, धर्मसत्ता आणि शाश्‍वत जीवनादर्श यांच्या सुसंवादी प्रभावाचा आणि म्हणूनच चरम अभ्युदयाचाही तो काल होता. दैन्य, दारिद्र्य, दुर्बलता, चारित्र्यभ्रष्टता, उथळ भोगलिप्सा यापासून तत्कालीन जीवन मुक्त होते. रघुवंशीय सम्राटांच्या छत्राखाली विशाल भूप्रदेशातील प्रजाजन सुख, शांती आणि समाधान यांनी परिपूर्ण जीवन जगत होते. पाश्‍चात्त्यांनी, त्यांच्या अनुभवावरून असेल, राजेशाही व तदनुषंगिक सरंजामशाही (मॉनर्की ऍण्ड फ्यूडॉलिझम) म्हणजे एका व्यक्तीचा निरंकुश लहरी कारभार, चैनविला, प्रजेची गळचेपी आणि अन्याय्यशोषण अशी समजूत रूढ केली आहे. पाश्‍चात्त्य मापानेच त्यांनी भारतवर्षातील राजसंस्थेची वासलात लावून टाकली. पण रघुवंशाचा तर या विकृत चित्राशी कुठे मेळच बसत नाही. दिलीप, रघू, अज, दशरथ आणि राम या चक्रवर्ती सम्राटांनी स्वत:ला सदैव राजसिंहासनाचे उपभोगशून्य स्वामी मानले आणि प्रजेला संतुष्ट राखण्यासाठी व्यक्तिगत सुखांचा आनंदाने होम गेला. अशा या सम्राटांचे रसाळ चरित्र या पुस्तकात समाविष्ट आहे.
Availability: 3 in stock
₹ 30.00

रघुवंशाचा प्रदीर्घ चंडप्रतापी इतिहास हा भारतवर्षाच्या प्राचीन जीवनधारेची थोर गुणवत्ता प्रकट करणारा गौरवान्वित इतिहास आहे. विशेषत: दंडसत्ता, धर्मसत्ता आणि शाश्‍वत जीवनादर्श यांच्या सुसंवादी प्रभावाचा आणि म्हणूनच चरम अभ्युदयाचाही तो काल होता. दैन्य, दारिद्र्य, दुर्बलता, चारित्र्यभ्रष्टता, उथळ भोगलिप्सा यापासून तत्कालीन जीवन मुक्त होते. रघुवंशीय सम्राटांच्या छत्राखाली विशाल भूप्रदेशातील प्रजाजन सुख, शांती आणि समाधान यांनी परिपूर्ण जीवन जगत होते.

पाश्‍चात्त्यांनी, त्यांच्या अनुभवावरून असेल, राजेशाही व तदनुषंगिक सरंजामशाही (मॉनर्की ऍण्ड फ्यूडॉलिझम) म्हणजे एका व्यक्तीचा निरंकुश लहरी कारभार, चैनविला, प्रजेची गळचेपी आणि अन्याय्यशोषण अशी समजूत रूढ केली आहे. पाश्‍चात्त्य मापानेच त्यांनी भारतवर्षातील राजसंस्थेची वासलात लावून टाकली. पण रघुवंशाचा तर या विकृत चित्राशी कुठे मेळच बसत नाही. दिलीप, रघू, अज, दशरथ आणि राम या चक्रवर्ती सम्राटांनी स्वत:ला सदैव राजसिंहासनाचे उपभोगशून्य स्वामी मानले आणि प्रजेला संतुष्ट राखण्यासाठी व्यक्तिगत सुखांचा आनंदाने होम गेला. अशा या सम्राटांचे रसाळ चरित्र या पुस्तकात समाविष्ट आहे.

Leave a Message. X

: *
: *
: *
:
Call us: +91-1145633345